हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप केला जात आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत या सरकारला कसलाही विचार नाही. सत्तेत आल्यापासून आपल्या खादाड वृत्तीला कायम ठेवून सरकारने आता कर्मचाऱ्यांचा पगार खायलाही सुरुवात केली आहे,” अशी टीका पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, महाविकास आघाडी सरकारला आता एसटी कर्मचाऱ्यांची कसलीही पर्वा राहिलेली नाही, असं दिसून येत आहे. गेल्या २ महिन्यांपासून संपावर असलेल्या ६६,६०७ एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही वेतन दिले गेले नाही. कर्मचाऱ्यांना शासकीय सुविधा द्याव्यात, अशी आमचीही मागणी आहे. मात्र, इथे त्यांच्या वेतनाचाच पत्ता नाही.
कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत या सरकारला कसलाही विचार नाही. सत्तेत आल्यापासून आपल्या खादाड वृत्तीला कायम ठेवून सरकारने आता कर्मचाऱ्यांचा पगार खायलाही सुरुवात केली आहे. एसटी कर्मचारी सरकारचे विरोधक नसून ते आपल्या न्याय-हक्कांसाठी लढत आहेत, त्यांच्यावर ही कसली हुकुमशाही ?
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 7, 2022
एसटी कर्मचारी सरकारचे विरोधक नसून ते आपल्या न्याय-हक्कांसाठी लढत आहेत, त्यांच्यावर ही कसली हुकुमशाही ? वेतन सोडा त्यांना आपले घर सांभाळण्यासाठी रेशनची सुविधादेखील तुम्ही करू शकला नाहीत, अखेर भाजपाने एसटी कर्मचारी बांधवांसाठी रेशनाची सुविधा केली. सरकारचा हा निष्काळजीपणाचा कारभार कधी संपेल माहीत नाही, मात्र भाजपा सदैव एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे पाटील यांनी ट्विटद्वारे म्हंटले आहे.