देश पंतप्रधानांच्या वाढ वडिलांच्या मालकीचा नाही, चंद्रशेखर राव यांचे मोदींवर टीकास्त्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली | स्वप्निल हिंगे

काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांच्या वडिलांबाबत सुरू ठेवलेल्या टोचण्या संपत नाही तोच, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधानांच्या वडिलांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ‘भारत देश हा पंतप्रधानांच्या वडिलांचा किंवा त्यांच्या आजोबांच्या मालकीचा नाही’ अश्या शब्दांत चंद्रशेखर राव यांनी मोदी यांच्यावर टीका केली. ते तेलंगणातील संगारेड्डी येथील निवडणूक परिषदेत बोलत होते.

‘भारत तुमच्या वडिलांचा किंवा आजोबांच्या मालकीचा आहे का? ही लोकशाही आहे, तुम्ही किती दिवस सत्तेवर रहाल?’ असा सवाल यावेळी रेड्डी त्यांनी उपस्थित केला. तेलंगणातील आदिवासी आणि मुसलमानां साठी आरक्षण वाढवून देण्यास परवानगी न दिल्यामुळे चंद्रशेखर राव यांनी मोदींवर टिका केली. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या विधानाची पुष्टी करत ते म्हणाले, मी केवळ हा प्रस्ताव देण्यासाठी दिल्लीला गेलो नव्हतो. केंद्राला याआधी 30 पत्रेही लिहिली होती. मंत्र्यांनीही दिल्लीला जाऊन मोदींची भेट घेऊन प्रस्ताव मंजूर करणयाची शिफारस केली होती. परंतु आता ते म्हणत आहेत की हा प्रस्ताव मंजूर करणार नाही. आणि दुसऱ्याला ही करू देणार नाही.

‘तेलंगणाला तेव्हाच न्याय मिळेल जेव्हा बिगर भाजपा, बिगर काँग्रेसचे सरकार केंद्रात येईल’ असेही राव यांनी सांगितले. यापूर्वीही काँग्रेस च्या नेत्यांनी मोदींच्या आई वडिलांच्या नावाचा उल्लेख घेत राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पंतप्रधानांनी ही त्यांच्यावर पलट वार केला होता .

Leave a Comment