Sunday, May 28, 2023

मुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला घ्यावा ; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संजय राऊत यांना स्वत:वर टीका झाली की लगेच टोचते. मुख्यमंत्री हे कारभार चालवण्यासाठी शरद पवार यांचा सल्ला घेतात, हे अखेर संजय राऊत यांनी मान्य केले. आता मुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला घ्यावा, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. तसेच भाजपवर टीका करणे ही संजय राऊत यांना नेमून दिलेली ड्युटी आहे. किंबहुना त्यामुळेच संजय राऊत यांचे पद टिकून असल्याची खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

चंद्रकांत पाटील पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते, यादरम्यान त्यांनी ही टीका केली .संजय राऊत भाजपवर टीका करत असल्यामुळेच त्यांचे पद टिकून आहे. आज त्यांनी शरद पवार हेच सरकार चालवत असल्याचे मान्य केले. तर महाविकासआघाडी सरकारच्या एका वर्षातील कारभाराला जनता शून्य गुण देईल.

काय म्हणाले होते संजय राऊत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सरकारमधील ज्येष्ठ नेते आहेतत. त्यामुळे ते सर्वांना मार्गदर्शन करतात. जर सरकार शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’