हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO कडून आता बहुतेक सेवा या ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ज्यामुळे ईपीएफओ मेंबर्सना आपल्या खात्याशी संबंधित सर्व कामे घर बसल्या करता येतात. त्यासाठी त्यांना आता ईपीएफओ ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागत नाहीत.
हे लक्षात घ्या कि, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने कडून आता वेगाने आपल्या सेवांचे डिजिटायझेशन केले जात आहे. ज्यामुळे ईपीएफ खातेधारकाला ईपीएफओ शी लिंक केलेला आपला मोबाईल नंबर घर बसल्या सहजपणे बदलता येतो. ईपीएफ खात्याशी संबंधित सर्व SMS आपल्या रजिस्टर्ड क्रमांकावर पाठवले जातात. आजकाल ऑनलाइन काम हाताळण्यासाठी OTP बंधनकारक करण्यात आला आहे जो फक्त सदस्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरच पाठविला जातो. त्यामुळे आपला चालू असलेला मोबाईल नंबर ईपीएफ खात्याशी अपडेट केला पाहिजे.
अशा प्रकारे आपला मोबाईल नंबर EPF खात्याशी अपडेट करा …
EPF मेंबर पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा आणि लॉग इन करा.
Manage सेक्शनमध्ये Contact detail वर क्लिक करा.
चेक मोबाईल नंबर पर्यायावर क्लिक करा. आता एक नवीन सेक्शन उघडेल.
नवीन मोबाईल नंबर दोनदा टाका.
आता ‘Get Authorization Pin’ वर क्लिक करा.
यानंतर नवीन नंबरवर एक OTP येईल.
दिलेल्या जागेत OTP टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
आता आपला नवीन क्रमांक EPF पोर्टलमध्ये अपडेट केला जाईल.
सर्व डिटेल्स अपडेट करा
पीएफ खात्यासोबतच ईपीएफओ कडे कर्मचार्यांचा मोबाईल क्रमांक, नाव-पत्ता, नॉमिनी डिटेल्स, बँक खात्यासारखी माहितीही असते. त्यामुळे जर यापैकी कशामध्येही बदल केला गेला तर तो PF खात्यातही अपडेट करावा. जर एखाद्याने आपले बँक अकाउंट बदलले तर त्याने ते देखील पीएफ खात्यामध्ये अपडेट करावे. याशिवाय, EPFO कडून सर्व ग्राहकांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) जारी केला जातो. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला आपला UAN नंबर माहित असणे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय अनेक कामे रखडली जातात.
हे पण वाचा :
Share Market : ‘या’ Paints कंपन्यांच्या शेअर्सनी 3 वर्षात पैसे केले दुप्पट !!!
ICICI Bank कडून 6 दिवसात दुसऱ्यांदा FD वरील व्याजदरात वाढ, सुधारित दर जाणून घ्या
किसान विकास पत्रामध्ये TAX कसा आकारला जातो ??? अशा प्रकारे समजून घ्या
PF Account : आता घरबसल्या अशा प्रकारे जनरेट करा UAN नंबर !!!
गुप्तचर विभागाने एकनाथ शिंदेच्या बंडाची दोन महिन्यांपूर्वीच दिली होती कल्पना, मात्र…