पाटण नगरपंचायतीत बदल झालेला दिसणार : ना. शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील गृहराज्यमंत्री यांच्या मतदार संघातील एकमेव असलेल्या पाटण नगरपंचायत निवडणुकीत उस्फुर्तपणे मतदान सुरु आहे. विधानसभा व लोकसभेला ज्या पध्दतीने मतदान होते, त्याच पध्दतीने मतदान सुरू आहे.  पाटणमधील मूलभूत प्रश्नांच्या मुद्यावर शिवसेना निवडणूक लढत आहे, निश्चितपणाने पाटण नगरपंचयातीत बदल झालेला दिसेल, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

राज्यात सुरू असलेल्या नगरपंचायतीच्या मतदान प्रक्रिया संदर्भात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी पाटण येथील मतदान केंद्रावर स्वतः जावून पाहणी केली. पाटण नगरपंचायतीत सध्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पाटणकर गटाची सत्ता आहे. यंदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गट, शिवसेना व काॅंग्रेस रिंगणात आहे.

पोलिसांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना : शंभूराज देसाई 

आज राज्यात नगरपंचायतीसाठी सुरु असलेल्या निवडणुकांचे मतदान शांततेत पार पडत आहे. पोलिस विभागाकडून सर्वच ठिकाणी कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यात आलेली आहे. राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. सर्वच पक्षातील नेते, उमेदवार व कार्यकर्त्यांना आवाहन करतो त्यांनी शांततेन सर्व प्रक्रिया पार पाडावी. मतदान प्रक्रियेत मुद्दाम कोणी शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई करावी अशा सूचना दिल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

Leave a Comment