कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत शनिवारी (दि. 24) कुसरुंड (ता. पाटण) येथील ग्रामदेवतेची पालखी काढून गर्दी केल्याप्रकरणी 16 जणांवर पाटण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद अनिल अशोक सुतार (वय- 29) यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरूनाचा संसर्ग रोखण्यासाठी खाजगी तसेच सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेली आहे. गर्दी टाळण्यासाठी शासनाकडून कोरोना नियमांचे कट्टर पालन करण्याच्या सूचनाही वारंवार दिल्या जात आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून गावो-गावच्या यात्रा गर्दी टाळण्यासाठी शासनाकडून नियमांचे कट्टर पालन करण्याच्या सूचनाही वारंवार दिल्या जात आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून गावोगावच्या यात्रावर ही बंदी घालण्यात आली आहे. मात्र आदेशाचे उल्लंघन करत कुसरुंड येथील कमिटीने ग्रामदेवतेची पालखी काढून कोव्हीड नियमांची पायमल्ली केली आहे. आदेशाचे उल्लंघन करत शनिवारी 24 रोजी कुसरुंड येथील कमिटीने ग्रामदेवतेची पालखी काढून कोव्हीड नियमांची पायमल्ली केली होती.
याप्रकरणी कुसरुंड येथील अधिक प्रभाकर सुतार, मारुती पांडुरंग कोळेकर, संतोष आनंदा पवार, चंद्रकांत पवार, ज्ञानदेव चंदू शिंदे, नथुराम रामचंद्र कांबळे, भानुदास यशवंत सुतार, तानाजी जगन्नाथ शिंदे, मधुकर साधू शिंदे, श्रीरंग रामचंद्र पवार, मारुती आनंद शिंदे, संपत केशव गुरव, नामदेव रामचंद्र कुंभार, तुकाराम विठ्ठल कुंभार, संजय रामचंद्र मोरे, मुबारक यासीन शेख सर्व (रा. कुसरूड, ता. पाटण) यांच्यावर पाटण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group