हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये (EPFO) आपल्या पगारातून योगदान देणारा प्रत्येक कर्मचारी रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळवण्यासाठी पात्र असतो. कर्मचारी पेन्शन योजना (EPD) मध्ये रिटायरमेंटनंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला एक 12-अंकी पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) नंबर दिला जातो. हा PPO कोड प्रत्येक पेन्शनधारकासाठी युनिक असतो. जो केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाशी प्रत्येक कम्युनिकेशनसाठी रेफरन्स नंबर म्हणून उपयोगी ठरतो.
या 12 अंकी PPO नंबरच्या मदतीने, EPS मेम्बर्सना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या वेबसाइटवर आपल्या पेन्शनचे स्टेट्स तपासता येतील. चला तर मग त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया…
EPFO पोर्टलवर अशा प्रकारे तपासा पेन्शनचे स्टेट्स
आपल्या पेन्शनचे स्टेट्स तपासण्यासाठी EPFO च्या अधिकृत वेबसाइट http://www.epfindia.gov.in ला भेट द्या.
EPFO होमपेजवर ‘ऑनलाइन सर्व्हिसेस’ अंतर्गत ‘Pensioners’ Portal’ वर क्लिक करा
येथे ‘Welcome to Pensioners’ हे नवीन पेज दिसेल.
डाव्या पॅनलवरील ‘Know Your Pension Status’ या पर्यायावर क्लिक करा.
‘Issued Office’ ड्रॉपडाऊन अंतर्गत आपले ऑफिस लोकेशन निवडा
यानंतर ऑफिस आयडी आणि PPO नंबर एंटर करा आणि नंतर ‘Get Status’ पर्यायावर क्लिक करा.
PPO नंबर म्हणजे काय आहे ???
प्रत्येक पेन्शनधारक कर्मचाऱ्याला PPO नंबर दिला जातो. यातील पहिले पाच अंक PPO नंबर जारी करणार्या प्राधिकरणाचा कोड नंबर दर्शवतात, तसेच यापुढील दोन अंक इश्यूचे वर्ष दर्शवतात, यापुढील चार अंक PPO चा अनुक्रमिक नंबर आणि शेवटचा अंक कॉम्प्युटरच्या उद्देशांसाठी चेक अंक दर्शवतात.
हे लक्षात घ्या कि, आपण जेव्हा पेन्शनसाठी अर्ज करतो किंवा लाईफ सर्टिफिकेट सादर करतो तेव्हा 12 अंकी PPO नंबर आवश्यक असतो. वास्तविक, याशिवाय पीएफ खाते एका बँकेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर करता येत नाही. कोणत्याही EPF पेन्शनधारकाला बँक खाते क्रमांक किंवा पीएफ क्रमांक वापरून PPO नंबर मिळवता येतो.
‘वेलकम टू पेन्शनर्स’ पोर्टल पेजवर ‘Know Your PPO No.’ वर क्लिक करा.
बँक खाते नंबर किंवा मेंबर आयडी (पीएफ नंबर) सबमिट करा.
यानंतर स्क्रीनवर एक PPO नंबर दिसेल.
हे पण वाचा :
Business Idea : हिवाळ्यात अशा प्रकारे ड्रायफ्रूट्सचा व्यवसाय सुरू करून मिळवा मोठा नफा
DCB Bank कडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 8.25% पर्यंत व्याज
Stock Market : बुल अन् बेअर मार्केट म्हणजे काय ??? यादरम्यान गुंतवणूकदारांनी काय करावे ते जाणून घ्या
Gold Loan : गोल्ड ओव्हरड्राफ्ट लोन सुविधा म्हणजे काय ??? त्याचे फायदे अन् जोखीम समजून घ्या
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्ताहिकरित्या वाढ, जाणून घ्या संपूर्ण आठवड्यातील सराफा बाजाराची स्थिती