Petrol- Diesel टाकताना ‘या’ गोष्टीकडे लक्ष्य द्या, अन्यथा होईल मोठं नुकसान

petrol disel density
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण सर्वच नेहमी पेट्रोल-डिझेल ह्यांसारख्या इंधनाच्या भडकलेल्या किंमती बद्दल बोलत असतो. बाजारात दाखल होणारी नव्या कोऱ्या गाडीबद्दल आपण संपूर्ण माहिती गोळा करतो. गाडी चालवण्याचे नियम जाणून घेतो पण त्या गाडीत भरण्यात येणाऱ्या इंधनाबाबत एक महत्वाची गोष्ट आपण हमखास नजरंदाज करतो. जर आपल्याला आपल्या गाडीचे आयुष्य वाढवायचे असेल तर हि बातमी तुमच्या फायद्याची ठरू शकते.

पेट्रोल-डिझेलमध्ये उपलब्ध असलेली घनता

तुम्ही जेव्हा पेट्रोल पंपावर आपल्या कार वा बाईकमध्ये पेट्रोल वा डिझेल भरावयास जाता तेव्हा पंप मशीनच्या डिस्प्लेवर शून्य पाहण्यास विसरत नाही. गाडीत इंधन भरताना ते पाहणे जरुरीचे आहे. पण त्या मशीनवर आणखीन एक डिस्प्ले असतो ज्याकडे आपण पाहतच नाही. आपले लक्ष हे नेहमी पेट्रोलच्या पंप मशीनवर आणि त्या समोर पडणाऱ्या किंमतीच्या आकड्यांवर असते. पंपचालकाने मशीन मध्ये 100 रुपयांचा आकडा टाकताच तुम्ही देखील 100 रुपयांचे पेट्रोल व डिझेल भरल्याची शाश्वती बाळगून पंप चालकास 100 रुपये देऊन आपल्या मार्गाला लागता.

पण तुमच्या गाडीत भरण्यात येणारे पेट्रोल हे किती ? प्रमाणात शुदध आहे ते तुम्ही पाहतच नाही. आज आम्ही तुम्हाला ह्या लेखाच्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलच्या शुद्धतेबाबत एक अशी माहिती सांगणार आहोत ज्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या गाडीत भरण्यात येणाऱ्या इंधनाच्या शुद्धतेबद्दल जाणू शकता ज्याद्वारे तुमच्या गाडीच्या इंजिनचे आयुष्यही वाढू शकते.

कश्या प्रकारे तुम्ही तपासून पाहू शकता पेट्रोल-डिझेलची घनता

खरे तर पेट्रोल – डिझेलची शुद्धता तिच्या घनतेवर अवलूंबून आहे जी तुम्ही सहजरीत्या तपासू शकता. सरकारने इंधनाच्या घनतेचे काही प्रमाण निश्चित केले आहेत त्या योगे तुम्ही तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले इंधन हे किती प्रमाणात शुद्ध आहे हे जाणू शकता.

आता जर तुम्ही आता विचार करत असाल कि इंधनाची घनता कुठे तपासण्यात येते त्यासाठी तुम्हाला कुठे जावे लागेल तर त्याचे उत्तर ‘हे कुठेच नाही ‘ असेच म्हणावे लागेल. कारण पेट्रोल भरताना जी पंप मशीन असते त्यावर पेट्रोल- डिझेलच्या घनतेची माहिती नमूद केलेली असते तसेच पेट्रोल-डिझेल च्या पावतीवरही त्याची घनता लिहिलेली असते.

इंधनाशी संबंधित घनता

प्रत्येक पदार्थाचे एक निश्चित घनत्व असते . त्यानुसार सरकारने पेट्रोल-डिझेलच्या घनतेचेही एक प्रमाण निश्चित केले आहे पेट्रोल ची घनता हि ७०० ते ८०० प्रति किलोग्रॅम घनमीटर आहे तर डिझेलची घनता हि ८०० ते ९०० प्रति किलोग्रॅम घनमीटर निश्चित करण्यात आली आहे. ह्यातील घनतेचे प्रमाण हे एकसारखे नसले तरी तापमानानुसार त्यात बदल होऊ शकतो.

कुठे तपासता येऊ शकते घनता

पण जर ठरवलेल्या प्रमाणापेक्षाही इंधनात कमी प्रमाणात घनता आढळून आली तर त्याची तक्रार तुम्ही ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत अधिनियम १९८६ नुसार तक्रार करू शकता.कारण ग्राहकाला योग्य घनतेचे इंधन मिळणे हा त्याचा अधिकार आहे.