व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

70 वर्षांनंतर चित्ता भारतात; मोदींकडून स्वागत अन् फोटोसेशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल 70 वर्षांनंतर भारतात चित्ते परतले आहेत. दक्षिण अफ्रिकेतील नामिबियातून हे चित्ते आज सकाळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आणण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सर्व चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. यावेळी मोदींनी फोटोसेशन केल्याचेही पहायला मिळाले.

नामिबिया तुन आणलेल्या एकूण आठ चित्त्यांमध्ये पाच मादी तर तीन नर चित्ते आहेत. या आठ चित्त्यांसाठी कुनो राष्ट्रीय उद्यानात विशेष क्षेत्र तयार करण्यात आले आहे. नामिबियाहून आल्यानंतर चित्त्यांना काही काळ क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येणार आहे. कुनो नॅशनल पार्क हे 748 चौरस किलोमीटरवर पसरलेलं संरक्षित क्षेत्र आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी 12 किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे.

दरम्यान, आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आता देशात नव्या ऊर्जेने चित्त्यांचे पुनर्वसन होऊ लागलं आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचं रक्षण झालं की आपले भविष्यही सुरक्षित असतं. विकासाचे आणि समृद्धीचे मार्गही खुले होतात. कुनो नॅशनल पार्कमध्ये जेव्हा चित्ता पुन्हा धावतील, तेव्हा येथील गवताळ प्रदेशाची परिसंस्था पुन्हा पूर्ववत होईल”, असं मत यावेळी मोदींनी व्यक्त केलं.