मी आमदार असताना तुम्ही हापचड्डीत शाळेत जात होता

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीगोंदा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच बरसले आहेत. माझी काहीच चूक नसताना मला जेल मध्ये टाकण्यात आले आणि मुख्यमंत्री माझ्या भाषणावरून मला धमकी देत आहेत. मी महापौर , आमदार असताना देवेंद्रभाई तुम्ही हाप चड्डीत शाळेत जात होता. आता भाषण काय करायचे ते मी तुम्हाला विचारू का? असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

भाजपच्या मनात गांधी द्वेष किती आहे याचा प्रत्यय नगर मध्ये आला आहे. भाजपला अनेक मतदारसंघात उमेदवार नव्हते म्हणून भाजपने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधून लोक पळवले आहेत. भाजप हि मुले पळवणारी टोळी आहे. त्यामुळे भाजप पासून तुम्ही सावध राहावे असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

मोदींच्या चौकीदारीवर देखील छगन भुजबळ यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. देशाचा चौकीदार साधा सुधा चौकीदार नाही. देशाचा चौकीदार १० लाखाचा कोट घालतो. त्याच्या कार्यकाळात संरक्षण मंत्रालयातील महत्वाची कागदपत्र चोरीला जातात असे म्हणत छगन भुजबळ यांनी पुलवामा हल्ला  झाल्यानंतर भाजप कडून केले गेलेल्या राजकारणाला घाणेरडे राजकारण संबोधून मोदी सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.