हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज पुन्हा एकदा खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेले पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सारथी’संदर्भात लक्ष केंद्रीत करावे आणि १ हजार कोटींची मदत लवकर जाहीर करावी अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. जर मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथीसाठी लक्ष केंद्रीत करत १ हजार कोटींची मदत जाहीर करावी. ही मदत एकदम देणे शक्य नसल्यास सरकारने फेज १ फेज २, फेज ३ अशी टप्पाटप्याने करुन द्यावी. सारथीसंदर्भातील मागण्यांना १ महिना पूर्ण होत असल्याने सरकारने यावर लक्ष केंद्रीत करावे. अशी मागणी त्यांनी केली आहे.
सारथीच्या बाबतीत एक महिना आता जवळपास होत आलेला आहे. सरकारने त्यावर लक्ष केंद्रीत करावं. सारथी साठी जो निधी लागणार आहे तो अद्याप अर्थ विभागाकडून आलेले दिसत नाही. अजित पवार व अर्थ विभागाने यामध्ये लक्ष घालून हा निधी लवकरात लवकर जाहीर करावा. जेणेकरून त्यांनी जे ठरवलेलं आहे की, वर्षभरात काय कामं करायची ती मार्गी लागतील असेही संभाजीराजे यांनी म्हंटल.