Thursday, March 30, 2023

मराठा आरक्षणावर शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा; संभाजीराजेंची प्रतिक्रिया

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. संभाजीराजे हे मराठा आरक्षणासाठी नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी थेट शरद पवारांशी चर्चा केली. मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे.

मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे. तसंच मराठा समाजाच्या परिस्थितीची कल्पना शरद पवारांना दिली. तुम्ही पुढाकार घ्यावा अशी मी विनंती केली असून मुख्यमंत्री, विरोधी पक्ष, नारायण राणे यांना एकत्र आणलं पाहिजे असा आग्रह केला,” अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.

- Advertisement -

मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे असं मी शरद पवारांना सांगितलं असून त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर उद्या संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद होईल,” असं संभाजीराजेंनी सांगितलं

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.