हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने यश मिळवत सुवर्णपदका प्राप्त केले. त्यानंतर देशासह राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो, असे निर्जचे कौतुक करताना गौरोद्गारही काढले.
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करीत यश मिळविले. त्या खेळाडूंमध्ये हरियाणा राज्यातील भालाफेकपटू नीरज चोप्रा याचाही समावेश होता. या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा याने भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. याबद्दल त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीफोन करून अभिनंदन केले. तसेच नीरजच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला.
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकाची प्रतीक्षा भारत देशातील लोकांना लागली होती. या ऑलम्पिकमध्ये भ्रताच्यावतीने प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवण्यासाठी खूप परिश्रम घेतले. मात्र, या स्पर्धेत नीरज चोप्रा या खेळाडूने अॅथलेटिक्स फील्ड अॅण्ड ट्रॅक प्रकारात आपलया कामगिरीची चुणूक दाखवीत सुवर्ण पदक मिळवून दिले.