धक्कादायक ! रेल्वेसमोर उडी घेत तरुणाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदिया शहरामध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. हितेश वालदे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. जेवणानंतर खर्रा खाण्याच्या निमित्ताने तो घराबाहेर पडला त्यानंतर तो घरी परतलाच नाही. मृत हितेश वालदे याने आत्महत्या का केली याचे कारण अजून समजू शकले नाही.

गोंदिया जिल्ह्याच्या नवेगांव बांध येथील गोंदिया-बल्लरशहा रेल्वेमार्गावर ही घटना घडली आहे.रात्रीच्या सुमारास 34 वर्षीय हितेश वालदे याने धावत्या मालगाडीच्या समोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. हितेशनं नेमक्या कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. पोलीस आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?
हितेश रात्रीचं जेवण करुन खर्रा घेण्यासाठी जातो, असं सांगून घराबाहेर पडला होता. यानंतर त्याने मालगाडीच्या समोर उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली. या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसासह नवेगांव बांध पोलिसांना देण्यात आली. नवेगाव बांध पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

Leave a Comment