हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्र राज्याच मुख्यमंत्रीपद हे तस जबाबदारीच पद मानलं जात. कारण राज्याची धुरा त्यांच्या हाती असते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्यशासनाचे प्रमुख असतात. सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या यांच्याकडे असलेली जबाबदारी पाहता तेही राज्यच नेतृत्व करीत आहेत. यासाठी त्यांना शासनाकडून ठराविक स्वरूपाचे वेतन मिळते. या बाबतीत सांगायचं झालं तर इतर राज्यांच्या तुलनेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दरमहा ३ लाख २१ हजार रुपये एवढे मानधन मिळते.
विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा मध्यस्थीने शरद पवार, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन केले व उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सुरु झाला मुख्यमंत्रीपदाचा प्रवास. या पदाशी असे वेतन त्यांना शासनाकडून दिले जाते. कारण तेही एकप्रकारचे राज्य चालवण्याचे काम करतात.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणेच इतरही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पगार दिला जातो. केरळच्या मुख्यमंत्र्यांना प्रतिमहिना १ लाख ८५ हजार पगार मिळतो. विजयन यांना मिळणारा पगार १८ राज्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी आहे. देशात सर्वाधिक पगार घेणारे मुख्यमंत्री तेलंगानाचे आहेत. त्यांना दरमहा ४ लाख १० हजार पगार मिळतो. त्यापाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा नंबर असून त्यांना ४ लाख रुपये पगार मिळतो.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पगार दरमहा ३ लाख ६५ हजार आहे तर मिझोरम, राजस्थान, उत्तराखंड, ओरिसा, बंगाल या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या पेक्षा कमी पगार मिळतो. सर्वात कमी पगार नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना मिळतो. त्यांना दरमहा १ लाख १० हजार पगार आहे. पुडुचेरी १ लाख २० हजार, बंगाल १ लाख १७ हजार, कर्नाटक २ लाख, गोवा २ लाख २० हजार, गुजराथ ३ लाख २१ हजार, राजस्थान आणि उत्तराखंड १ लाख ७५ हजार, ओरिसा १ लाख ६५ हजार, मेघालय १ लाख ५० हजार, पंजाब २ लाख ९० हजार तर आंध्रप्रदेश मुख्यमंत्र्यांना ३ लाख ३५ हजार दरमहा पगार मिळतो.
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २००३ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे यांस कडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या कडे देण्यात आली. ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.१४ मे २०२० उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड.