हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी
पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केल्या आरोपांचे खंडन केले. यावेळी फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉंब मी फोडणार असे मलिकांनी लक्षात घ्यावे, असे सांगितले. फडणवीसांच्या इशाऱ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. काहीजण म्हणत आहेत कि दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार. मात्र, राजकीय फटाक्यांना दिवाळीची गरज नसते. पाकिस्तानात कधी बॉम्ब फोडतायत याची मी वाट पाहत आहे, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर एका कार्यक्रमात निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, ठरल्याप्रमाणे जर सर्व झाले असते तर मी ही ठरल्याप्रमाणे फोटोग्राफी केली असती आणि फडणवीसांनाही प्रदर्शनाला बोलावले असते. मुंबईतील मंत्रालयात वॉर रुम होती. मी विचार केला की वॉर कुणाशी करायचे? म्हणून मी त्या रूमचे नाव बदलून संकल्प कक्ष असे केले आहे. नव्या योजना आखण्यासाठी याचा वापर करायचा होता. पण कोरोनामुळे तिथले अधिकारी दुसरीकडे द्यावे लागले. आता परत त्याला चालना देत आहोत.
मी मंत्रालयात जात नसल्याचा माझ्यावर आरोप केला जातो. मात्र मला मंत्रालयात जाऊन दररोज पाट्या टाकायला आवडत नाही. जर घरून काम होत असेल तर मी ते करतो. जनतेची कामे होण्याशी मतलब. कामे कुठून पण करा, मंत्रालयात करा किंवा घरातून करा. पण लोकांची कामे होणे गरजेची आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.