मीही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात पण….; मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. असे अनेकदा विरोधकांकडून सांगितले जात होते. अजूनही याबाबत विरोधकांकडून बोलले जात असताना आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीबाबत मोठे विधान केले आहे.

महाविकास आघाडी सरकार हे जास्त दिवस टिकणार नाही असे भाजपकडून म्हंटले जात आहे. भाजपनंतर नुकत्याच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मित्र [पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीबद्दल म्हणाले कि, राजकीयदृष्ट्या पाहायचे झाले तर मी स्वतः काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या विरोधात आहे. मात्र, त्याचा असा अर्थ नाही कि मी या दोन्ही पक्षांनी सरकारमध्ये असताना केलेल्या चांगल्या कामाची निंदा, टीका करेन. मी जर त्यांच्या कामावर टीका केली तर ते चुकीचे ठरेल. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात व मी अशा प्रकारचा कधीच विचार केलेला नाही.

उद्धव ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल अशा प्रकारचे विधान करीत पुढे म्हणाले कि, मित्र पक्षांनी कोरोनाची भीती बाळगू नये. बाळासाहेब थोरात आम्हीही स्वबळावर येऊ असे म्हंटले आहे. पण स्वबळावर म्हणजे चालत येऊ, असा त्याचा अर्थ होतो काय? अशा प्रकारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत काँग्रेसला टोला लगावला.

Leave a Comment