हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवसेंदिवस मुंबईसह ठाण्याचा देखील विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन “ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प” उभारण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा मुद्दा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरे विकास मंत्र्यांसमोर मांडला आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय शहरे विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांची भेट घेतली. यावेळी, त्यांनी ठाणेकरांसाठी रिंग मेट्रो प्रकल्प का महत्त्वाचा आहे ही बाब मंत्री हरदीप यांना पटवून दिली. त्याचबरोबर, “मेट्रो कोचची संख्या वाढवावी” अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केली.
ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पावर चर्चा
दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय शहरे विकास मंत्री पुरी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी, मंत्री पुरी यांच्याशी महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध विकास कामांवर चर्चा केली. तसेच हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे देखील सांगितले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंत्री पुरी यांच्यासोबत ठाणे मेट्रोविषयी देखील चर्चा केली. “सध्या ठाणे शहरात दोन मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. मुंबईसह ठाणे शहराचा विस्तार वाढत आहे, त्यामुळे त्यामुळे आम्ही 29 किमी लांबीचा ठाणे रिंग मेट्रोचा सविस्तर प्रकल्प केंद्राला सादर केला आहे. या प्रकल्पाला तुम्ही मान्यता द्यावी आणि मेट्रो कोचची संख्या वाढवावी” अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी मंत्री पुरी यांना केली.
ठाणेकरांसाठी गिफ्ट
दरम्यान, सध्या स्थितीत आणि भविष्याच्या दृष्टीने मेट्रो कोच वाढवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तसेच ठाण्याच्या विस्ताराबरोबर रिंग रोड मेट्रोच्या प्रकल्पाची देखील आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून केंद्रीय मंत्री सकारात्मक निर्णय घेतील अशी ग्वाही देण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प हा सरकारकडून ठाणेकरांना मिळालेलं एक गिफ्ट आहे. हा प्रकल्प ऐकून 29 किमी लांबीचा असणार आहे. प्रकल्पांर्गत एकूण 22 स्थानके असतील. ज्यातील दोन भूमिगत असणार आहेत. ही दोन स्थानके रेल्वे स्थानकाला जोडली जातील. अन्य स्थानके शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडण्यात येईल. ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पामुळे ठाण्याची नक्की शोभा वाढेल.