हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखच्या सीमेवर भारताने रस्ता बांधण्याचे काम सुरु केल्यापासून चीनने सीमेवर आक्रमक हालचाली सुरु केल्याचे दिसून येते आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशातील सीमेवर तणावपूर्ण वातावरण आहे. आधी सिक्कीम, मग लडाख आणि आता उत्तराखंड अशा प्रकारे चीन आपले सैन्य सर्वत्र वाढवित असल्याचे दिसून येते आहे. त्यातच आता लडाखजवळील विमानतळावर बांधकाम सुरु झाले असून तिथे धावपट्टी तयार केली जात असल्याचे सॅटेलाईटच्या प्रतिमामधून दिसत आहे. मे च्या सुरुवातीला प्रथम भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. वादानंतर दोन्हीकडून अतिरिक्त सैन्य तैनात केले जात आहे.
डेट्रेस्फान (detrefsa_) ने तिबेटमधील नगरी गुन्सा विमानतळावरील २ फोटो काढले आहेत. एक ६ एप्रिल २०२० चा आहे तर दुसरा २१ मी २०२० चा आहे. मागच्या महिन्यात एकच धावपट्टी होती मात्र आता दुसऱ्या धावपट्टीचे काम वेगाने सुरु असल्याचे दिसून येत आहे. तिसऱ्या आणखी एका फोटोत या धावपट्टीशेजारी असणारी लढाऊ विमाने स्पष्टपणे दिसत असून ही धावपट्टी या विमानांसाठी असल्याचे सांगितले जात आहे. चीनी सैन्याची ४ विमाने इथे तैनात करण्यात आली आहेत. ही विमाने जे-११ किंवा जे-१७ असू शकण्याचा अंदाज आहे. जे-११ आणि जे-१७ यांची बनावट रशियाच्या सुखोई -२७ सारखी आहे तर भारतीय हवाई दलाचा विचार केल्यास जे-११ आणि जे-१७ ची तुलना सुखोई -३० एमकेआय सोबत होऊ शकते.
डिसेंबर २०१९ मध्ये पहिल्यांदा हि विमाने इथे तैनात करण्यात आली होती. आता ती स्पष्टपणे दिसून येतात. या विमानतळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील सर्वाधिक उंच विमानतळ मानले जाते. हे समुद्रसपाटीपासून तब्बल १४ हजार २२ फूट आहे. याचा नागरी उड्डाणासाठी वापर होतोच पण सैनिकी कारवायांसाठी हे विमानतळ प्रसिद्ध आहे. भारतावर इतक्या सहज चीनला हल्ला करता येणार नसला तरी युद्धाची चिन्हे दिसून येत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”