चीनमुळे जगावर लादले पुन्हा एकदा मोठे संकट! नियंत्रणाबाहेर गेले अंतराळात पाठवलेले रॉकेट; कोठेही कोसळण्याची भीती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चीन आपल्या शेजारील देशांना आणि जगातील इतर देशांना त्रास देण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. जगामध्ये करोना वायरस पसरून चिनने संपूर्ण जगाला एक मोठे संकट दिले आहे. हे संकट दिवसेंदिवस अजून मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. चीनने आता पुन्हा एकदा जगाला मोठ्या संकटात टाकले आहे. ते संकट म्हणजे, अंतराळात पाठवलेले रॉकेट चीनच्या नियंत्रणातून बाहेर गेले असून ते पृथ्वीवर पुन्हा प्रवेश करताना मोठे विध्वंस करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे रॉकेट आठ मे ला पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रवेश करेल. काही दिवसांपूर्वी याच रॉकेटवरून काढलेल्या फोटोनी चीनने भारताची पेटत्या चितावरून खिल्ली उडवली होती.

चिनने जगाला दिलेल्या या दुसर्‍या मोठ्या संकटावर अमेरिकेने जगाला गंभीर इशारा दिला आहे. यामध्ये म्हटले आहे की, एकवीस टन वजनाचे हे रॉकेट पृथ्वीच्या कक्षेमध्ये आठ मे रोजी कधीही प्रवेश करू शकते. हे सांगणे कठीण आहे की, कोणत्या भागातून हे रॉकेट प्रवेश करेल आणि कुठे येऊन कोसळेल. अमेरिकेने आपले सर्व सॅटेलाइट या रॉकेटला ट्रेक करण्यासाठी लावली आहेत.

या गंभीर प्रकरणावर बोलताना अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते माइक हार्डवेअर यांनी सांगितले आहे की, “ही घटना स्पेस कमांडच्या अंतर्गत येते. चिनी रॉकेटच्या स्थितीवर सतत नजर ठेव ठेवली जात आहे. मात्र पृथ्वीच्या कक्षेच्या आतमध्ये प्रवेश करण्याआधी हे रॉकेट कोणत्या भागातून प्रवेश करेल हे सांगता येणे कठीण आहे”. त्यामुळे सर्व देशांनी सावध राहणे सध्याच्या घडीला खूप महत्त्वाचे आहे.

You might also like