हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ED कडून शनिवारी बेंगळुरूमधील रेझरपे, कॅशफ्री आणि पेटीएमच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. चायनीज इन्स्टंट लोन ऍपच्या प्रकरणात हे छापे टाकण्यात आल्याचे ED ने यावेळी सांगितले आहे. तसेच ही छापेमारी शुक्रवारीच सुरू झाल्याचेही ईडीकडून सांगण्यात आले. हे जाणून घ्या कि, या तिन्ही कंपन्यांचे नियंत्रण प्रामुख्याने चिनी कंपन्यांच्या हातात आहे.
इन्स्टंट लोन ऍपशी संबंधित 18 FIR नोंदवण्यात आल्यानंतर बेंगळुरू पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. अशा ऍप्सद्वारे कर्ज घेतलेल्या अनेकांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर केंद्रीय एजन्सीने ही कारवाई केली. यावेळी ED ने सांगितले की, चिनी व्यक्तींच्या नियंत्रणाखाली असलेल्या या कंपन्यांच्या “मर्चंट आयडी आणि बँक खात्यांमध्ये” जमा असलेले 17 कोटी रुपये या छाप्यांवेळी जप्त करण्यात आले आहेत.
इन्स्टंट लोन ऍप प्रकरण नक्की काय आहे ???
कोविड-19 च्या काळात पैशांची कमतरता भरून काढण्यासाठी अनेकांनी इन्स्टंट लोन ऍप्सद्वारे लोन घेतले. यामधील अनेक इन्स्टंट लोन ऍप्स हे चीनी कंपन्यांद्वारे चालवले जात होते. यावेळी हे कर्ज अत्यंत महागड्या व्याजदरात देण्यात आले होते. तसेच फोनमध्ये हे ऍप्स डाऊनलोड होताच फोनमधील सर्व माहिती या कंपन्यांनी बेकायदेशीररीत्या मिळवली. याद्वारे मिळालेल्या माहितीचा वापर करून कर्जदारांना धमकावले गेले आणि त्यांच्याकडून वाढीव व्याज दर आकारले गेले. ज्याच्या दबावामुळे अनेकांनी आत्महत्या केल्या.
पेटीएम आणि इतर कंपन्यांनी काय म्हंटले कि…
ED चे म्हणणे आहे की,” या कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या भारतीय नागरिकांच्या कागदपत्रांचा वापर त्यांना बनावट संचालक दाखवण्यासाठी केला जातो. मात्र प्रत्यक्षात या कंपन्या चीनमधील लोकांकडून चालवल्या जात आहेत.” ईडीच्या म्हणण्यानुसार, तपासाखाली असलेल्या या कंपन्या मर्चंट आयडी किंवा पेमेंट सर्व्हिस कंपन्या आणि बँकांशी जोडलेले खाते वापरून चुकीच्या पद्धतीने पैसे गोळा करत होत्या. याबरोबरच या कंपन्यांकडून देण्यात आलेले पत्ते देखील बनावट आहेत. आत या प्रकरणांचा ED कडून PMLA अंतर्गत तपास केला जात आहे.
कंपन्यांनी काय म्हटले ???
या संदर्भात पेटीएमचे प्रवक्ते म्हणाले, “आमच्याकडून कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना पूर्णपणे सहकार्य केले जात आहे. काही व्यापारी त्यांच्या तपासाखाली जरूर आहेत, ज्यांच्याबद्दल एजन्सींनी आमच्याकडे माहिती मागितली.” तर Razorpay च्या प्रवक्त्याने सांगितले की, “जवळपास दीड वर्षापूर्वी आमच्या काही व्यापाऱ्यांची ED द्वारे चौकशी करण्यात आली होती. तसेच या संदर्भात सुरू असलेल्या तपासासंदर्भात अधिका-यांनी आमच्याकडे अतिरिक्त माहिती मागितली. आमच्याकडून त्यांना पूर्ण सहकार्य केले जात आहे. तसेच त्यांना केवायसी आणि इतर तपशील देखील देण्यात आले आहेत.” त्याच वेळी, कॅशफ्री पेमेंट्सने सांगितले की,” ईडीला कारवाईत पूर्ण सहकार्य करण्यात आले आणि तपासाच्या दिवशीच त्यांना हवी असलेली सर्व माहिती देण्यात आली.”
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://enforcementdirectorate.gov.in/
हे पण वाचा :
SBI देत आहे अल्पवयीन मुलांसाठी खाते उघडण्याची सुविधा, त्याचे फायदे काय आहेत ते पहा
Kotak Mahindra Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा
Equitas Small Finance Bank च्या FD वर जास्त व्याज मिळवण्याची संधी !!!
Tamilnad Mercantile Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा
5 सप्टेंबरपर्यंत मिळणार PM Kisan योजनेच्या 12 व्या हप्त्याचे पैसे, अशा प्रकारे तपासा स्टेट्स !!!