हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chinmay Mandlekar Wife) चिन्मय मांडलेकर हे मराठी कलाविश्वात अत्यंत लोकप्रिय नाव आहे. मराठी मालिका, नाटक, चित्रपट आणि अगदी हिंदी चित्रपटातही त्याने उत्तम भूमिका साकारल्या आहेत. चिन्मय न केवळ अभिनेता तर एक उत्तम लेखक म्हणून देखील प्रेक्षकांचा लाडका आहे. त्याने कायमच आपल्या दमदार आणि कसदार अभिनयाने सर्वांच्या मनाला भुरळ घातली आहे.
त्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका यातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली भूमिका आहे. दरम्यान त्याने आपल्या मुलाचे नाव ‘जहांगीर’ ठेवल्याने तो सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत आहे. या ट्रोलिंगवर अखेर त्याची (Chinmay Mandlekar Wife) पत्नी नेहा मांडलेकरने संताप व्यक्त केला आहे.
नेहा मांडलेकरची पोस्ट (Chinmay Mandlekar Wife)
अभिनेता चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहा मांडलेकर सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपला संताप दर्शवणारी एक पोस्ट शेअर केली आहे. नेहाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर २ पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये तिने संतापाचे कारण असलेल्या प्रकाराविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तिने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यावर एका युजरने ‘स्वत:च्या मुलाला जहांगीर असं मुघलांचे नाव देणारा हा नाच्या’, अशी कमेंट केली होती.
या कमेंटवर नेहाने संताप व्यक्त करत ट्रोलर्सला खडे बोल सुनावले आहेत. आपल्या पोस्टमध्ये नेहाने म्हटलंय, ‘सॉरी हा दादा, तुम्हाला न विचारता आम्ही आमच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं. पण तुम्हाला कसं विचारलं असतं आम्ही… फेक अकाऊंट आहे ना तुमचं… मला तुमचा नंबर पाठवाल का..? म्हणजे जहांगीरच्या मुलाचं नाव आम्ही तुम्हाला विचारुन ठेवू, जय शिवराय’. यानंतर आणखी एकाने ‘एकाने जहांगीर कसा आहे? असे लिहून सोबत स्माईल इमोजी कमेंट केला होता. यावरही नेहाने संताप व्यक्त करत म्हटलं, ‘मस्त आहे आणि मस्तच राहिल. तुमच्या आशीर्वादाने… मी जहांगीरची आई… आमच्या लेकाचा इतक्या आपुलकीने विचारपूस केली… तुमचे खूप खूप आभार’.
ट्रोल करणाऱ्या व्यक्तीने मागितली माफी
तसेच नेहाने (Chinmay Mandlekar Wife) या पोस्टला कॅप्शन देताना ट्रोलर्सला तिखट अंदाजात सुनावले आहे. तिने या दोन्ही कमेंट करणाऱ्या ट्रोलर्सचे आभार मानत म्हटले, ‘धन्यवाद, तुम्ही इतकं छान बोललात आमच्याबद्दल… आमच्या मुलाबद्दल… तुमचं हे ज्ञानामृत वारंवार शेअर करायची आम्हाला संधी द्याल अशी आशा करते. देव तुमचं भलं करो… अनेक सदिच्छा’. या प्रकारानंतर ट्रोल करणाऱ्या एका व्यक्तीने नेहाची माफी मागताना म्हटले, ‘मला माफ करा मॅडम… मी सरांबद्दल चुकीची कमेंट केली होती त्याबद्दल… मी कमेंट डिलीट केली आहे. परत अशी चूक कुणाच्याच बाबतीत करणार नाही… सॉरी… माझी चूक माझ्या लक्षात आली’.
ट्रोलर्सची खरडपट्टी
ट्रॉलरच्या माफीनाम्यानंतर नेहाने (Chinmay Mandlekar Wife) या पोस्टला कॅप्शन देत म्हटले, ‘आहो आमची माफी वैगरे नको हो… आणि सर वैगरे काय म्हणताय उगाच!! आम्ही नाचे आणि त्याचा प्रचंड अभिमान आहे आम्हाला. फक्त एक लक्षात ठेवा… हा देश स्वतंत्र आहे. आणि आपण या स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक…आम्ही आमच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवून गुन्हा केलेला नाही. तसं केलं असतं तर कायद्याने शिक्षा केली असती आम्हाला… या देशाच्या संविधानाने आम्हाला आमच्या मुलाचं नाव आमच्या मर्जीने ठेवण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे. आम्ही तो बजावला आणि त्याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला… संविधानापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. कधीच नाही. जय शिवराय’.