सर्वज्ञानी संजयजी, आता कोणाचं थोबाड फोडायचं?? चित्रा वाघ भडकल्या

0
29
chitra wagh sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डोंबिवलीच्या भोपर ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीवर ३३ जणांनी अत्याचार केला. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था वरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आता कोणाचं थोबाड फोडायच असा सवाल त्यांनी केला.

सर्वज्ञानी संजय राऊतजी डोंबिवलीत १४ वर्षीय मुलीवर ३३ नराधमांनी बलात्कार केल्याची घटना घडलीये कळलयं का आपल्याला आता कुणाचं थोबाडं फोडायचं संजयजी? आहे का सरकारचं थोबाड फोडायची हिम्मत आपल्यात ?’ असे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना धारेवर धरले आहे.

दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सरकार वर निशाणा साधला. मुख्यमंत्री महोदय तुमची सत्ता हजार वर्षे ठेवा पण महिला सुरक्षित ठेवा. अशा घटना थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुन्हा करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी भरली पाहिजे. आता डोंबिवलीच्या घटनेनंतर तरी महिलांसाठी विशेष अधिवेशन सरकार घेईल अशी अपेक्षा आहे.’ अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here