माझ्यावर कितीही अटॅक केले तरी मी शांत राहणार नाही – चित्रा वाघ कडाडल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले आहे. माझ्या पतीविरोधात बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, माझ्या पतीला नाही तर मलाच या लोकांना अडकवायचं होतं, असा दावा वाघ यांनी केला. मी न घेतलेल्या कर्जाचंही मुंबै बँककडे चौकशी करण्यात आली होती, कारण मला अडकवायचं होतं, असं त्यांनी सांगितलं.

माझ्यावर कितीही अटॅक केले तरी मी शांत राहणार नाही, मी गप्प बसणार नाही, जोपर्यंत संजय राठोडांवर कारवाई होणार नाही, तोपर्यंत मी रोज बोलेण अस चित्रा वाघ म्हणाल्या. तुम्हाला सगळ्यांना मीच पुरुन उरणार आहे, नाही तुम्हाला पुरुन उरले नाही तर चित्रा वाघ नाव सांगणार नाही असही त्या म्हणाल्या.

5 जुलै रोजी माझ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज मला शरद पवारांची आठवण होते. पवार हे माझ्या वडिलांसारखे आहेत. माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पवारांनी मला बोलावून घेतलं. तक्रारीची कॉपी वाचली आणि तुझा नवरा कशातच नसल्याचं सांगितलं. त्यानंतर माझ्या पतीविरोधात केस उभी राहिली, असं त्या म्हणाल्या

दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणात सर्व गोष्टी योगायोगाने घडत आहेत. आणि राज्यातील तिन्ही पक्षाचे नेते बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत. या सरकारने व्याभिचाराचे उदात्तीकरण सुरू केलं आहे. आता अधिवेशन सुरू होत आहे. विरोधक या प्रकरणी सरकारला धारेवर धरणार असल्याने आज जर संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आल्यास आणि ते क्वॉरंटाईन झाल्यास मला नवल वाटणार नाही. कारण हे सर्व प्रकरण योगायोगानेच घडत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment