हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीड जिल्ह्यातला परळी येथील पूजा चव्हान नावाच्या तरुणीने पुण्यातल्या वानवडी या ठिकाणी आत्महत्या केली होती.त्या आत्महत्येमागे वनमंत्री संजय राठोड हेच असल्याचा आरोप सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून होतोय.त्याच बरोबर पुजाचे व्हायरल झालेले फोन कॉल रेकॉर्डिंग आणि फोटोज् या सगळ्याला चालना देत आहेत. संशयाची सुई त्यामुळे गडद होत चाललेली दिसते आहे.पूजाच्या या आत्महत्तेवर ठोस भूमिका घेतल्यामुळे भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांना प्रचंड ट्रोल करण्यात येतंय.त्यांचे मोर्फ केलेले फोटो प्रसिद्ध केले जात आहेत. अशातच त्यांच्या नवऱ्यावर एफ.आय.आर. सुद्धा दाखल करण्यात आली आहे.
या सगळ्या विषयावर बोलताना वाघ म्हणाल्या की “आज मला पवार साहेबांची फार आठवण येत आहे. २०१७ मध्ये जेव्हा पहिली एफआयआर दाखल झाली. तेव्हा शरद पवारांनी मला बोलावून घेतलं. तो बापच आहे माझा. त्यांना मी एफआयआरची कॉपी दाखवली. ते म्हणाले चित्रा यात तुझ्या नवऱ्याचं नावच नाहीये.’ ही आठवण सांगत त्यांनी ठाकरे सरकारच्या पूजा चव्हाण प्रकरणी गुन्हा दाखल करायला दिरंगाई मात्र आपल्या पतीवर तत्काळ कारवाई केल्याने रोष व्यक्त केला आहे.
दरम्यान, लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात ए.सी.बी.यांनी १२ फेब्रुवारी रोजी किशोर वाघ यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात चित्रा वाघ या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी लावून धरलेली आहे. त्याचवेळी चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’