“मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय”; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राज ठाकरेंकडून केराची टोपली??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज कवी कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन म्हणजे मराठी भाषा दिवस या मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने राज्यभर विविध प्रकारचे कार्यक्रम आजोजित करण्यात आले आहेत.मुंबईच्या शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली.

परंतु ते मास्क न घालता सार्वजनिक कार्यक्रमाला आले.यावर एका पत्रकाराने ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं.त्यामुळे राज ठाकरे यांनी नेमकं मुख्यमंत्री महोदयांचं अर्थात राज यांच्या दादूचं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का? असा प्रश्न समाज माध्यमांवर लोकं विचारत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज शिवाजी पार्कात मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी राज ठाकरे यांनी सहकुटुंब कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे यांनी मास्क लावलेला होता. मात्र राज ठाकरे यांनी मास्क लावलेला नव्हता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like