दादा…….क्या हुवा तेरा वादा…; एमपीएससी नियुक्त्यांवरून चित्रा वाघ यांचा अजित पवारांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. लोणकर याच्या आत्महत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील,अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरलेली नाहीत. त्यावरून आज भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. वाघ यांनी “मुख्यमंत्रीजी. व उपमुख्यमंत्रीजी स्वप्नीलच्या मृत्युचा इतक्यात विसर पडला. दादा…….क्या हुवा तेरा वादा…”असे ट्विट करून म्हंटले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात एमपीएससी नियुक्त्यावरून महत्वाची घोषणा केली होती. त्यामध्ये त्यांनी 31 जुलै पर्यंत एमपीएससीच्या सर्व जागा भरू, असे सांगितले होते आणि बाहेर येऊन फक्त आयोगावरील ‘सदस्यांच्या’ जागा भरू असे सांगितले होते. आता 31जुलै उलटून गेल्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून टीका केली जाऊ लागली आहे.

 

एमपीएससीच्या नियुक्त्यावरून आज सुरुवातीला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला नाही. याचा अर्थ हे अधिवेशनातही धडधडीत खोट बोलत होते, असे पडळकर यांनी म्हंटले आहे. त्यांच्यानंतर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.

Leave a Comment