काल काही फुटले आणि आज 13 झाले, यालाच म्हणतात तीन तेरा वाजणे; चित्रा वाघ यांची शिवसेनेवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला झटका देत आपल्या आमदारांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये भूकंप झाला असून सरकार कोसळेल की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशात भाजप नेत्यांकडून आता शिवसेनेवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. या दरम्यान आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी खोचक ट्विट केले आहे. “विधान परिषद निवडणुकीमध्ये काही फुटले, आज तेरा गेले यालाच तीन तेरा वाजणे असे म्हणतात असे ट्विट करत चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, काल काल काही फुटले आज १३ झाले. यालाच तीन तेरा वाजणे म्हणतात. असे ट्विट करत वाघ यांनी टीका केली आहे. त्यांनी यापूर्वीही शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे 35 आमदार असल्याचा दावा भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान आता शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असून, माजी मंत्री संजय राठोड व मलिंदा नार्वेकर हे दोघे मध्यस्थी करण्यासाठी सुरतला गेले आहेत. आता या सर्व घडामोडींवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी खोचक ट्विट केले आहे.

Leave a Comment