मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी पक्षाला चांगलेच खिंडार पाडण्याची योजना भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आखली आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत गेल्यानंतर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ देखील भाजपमध्ये जाणार आहेत. त्यांचा पक्ष प्रवेश येत्या ३० तारखे पर्यत केला जाण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीआहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठं मोठे नेते भाजपमध्ये येऊ लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसपुढे मोठे संकट उभा राहिले आहे. पक्षफूट कशी रोखायची याकडे पक्षाला आगामी काळात लक्ष दयावे लागणार आहे. चित्राला वाघ यांच्यासारखी राष्ट्रवादीची खंदि समर्थक राष्ट्रवादी सोडून का चालली आहे याबद्दल देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच चित्र वाघ यांच्या भाजप प्रवेशावर आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे.
चित्रा वाघ यांनी भाजपचे नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांचा पक्षप्रवेश येत्या ३० तारखेच्या आधी केला जाईल असे देखील बोलले जाते आहे. त्याच प्रमाणे त्यांच्या भाजप प्रवेशासाठी आमदार प्रसाद लाड यांनी मध्यस्ती केली आहे असे देखील समजते आहे.