नवी दिल्ली । न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू ख्रिस केर्न्सने मृत्यूशी लढाई जिंकली आहे. त्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया पूर्वी करण्यात आली होती. यानंतर तो पहिल्यांदाच जगासमोर आला. केर्न्सने एक व्हिडिओ मेसेज शेअर करून त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले. तो म्हणाला की,” मी नशीबवान आहे की मी येथे आहे. मात्र, अजून बराच पल्ला गाठायचा आहे.” हा माजी अष्टपैलू पुढे म्हणाला की,” 6 आठवड्यांपूर्वी मला टाइप-ए एओर्टिक डाइसेक्शनचा सामना करावा लागला. माझ्या हृदयाच्या धमन्या फाटल्या होत्या. मला शस्त्रक्रियेच्या अनेक फेऱ्या पार कराव्या लागल्या. मात्र डॉक्टर आणि नर्सनी माझा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि ते यात यशस्वी झाले.”
केर्न्स म्हणाला की,” या हृदय शस्त्रक्रियेनंतर अनेक गुंतागुंत निर्माण झाल्या होत्या. त्यापैकी एक स्पाइनल पॅरालिसिस होता. मला माहित आहे की, यावर मात करणे माझ्यासाठी आव्हानात्मक असेल. कॅनबेरा हॉस्पिटल, सिडनीचे सेंट व्हिन्सेंट, सर्जन, डॉक्टर, नर्स आणि तज्ज्ञ यांच्या टीमचे खूप आभार – तुम्ही माझे आयुष्य वाचवले. माझी पत्नी, मेलद्वारे पाठवलेल्या सर्व शुभेच्छांसाठी देखील धन्यवाद. हे सर्व चांगले मेसेजेस मिळाल्याने मला नम्र आणि उत्साही वाटते.”
It’s been a big 6 wks. On 4th August I suffered a Type A aortic dissection, a rare but serious condition. I required emergency surgery and from there a range of complications ensued and I ended up suffering a spinal stroke. A long road ahead, but I’m grateful to be here. ❤️ pic.twitter.com/ylRoz2HmPF
— Chris Cairns (@chriscairns168) September 19, 2021
ऑगस्टमध्ये केर्न्सची हृदय शस्त्रक्रिया झाली
केर्न्सची प्रकृती बिघडल्यानंतर ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येथे हृदय शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र, जेव्हा त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही, तेव्हा त्याला सिडनीच्या सेंट व्हिसेंट्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. येथे त्याच्यावर इमर्जन्सीमध्ये दुसरी शस्त्रक्रिया करण्यात. यानंतर त्याला लाईफ सपोर्ट सिस्टीमवरही ठेवावे लागले. पण चाहत्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या आणि तो हळूहळू ब्रा होऊ लागला. मात्र, या दरम्यान पाठीच्या दुखापतीनंतर त्याच्या पायाला पॅरालिसिस झाला. पण आता तो पूर्वीपेक्षा चांगला आहे आणि व्हिडिओ मेसेज शेअर करून चाहत्यांचे आभार मानले.
केर्न्सने 8 हजारांहून अधिक धावा केल्या
माजी कसोटीपटू लान्स केर्न्स यांचा मुलगा असलेला ख्रिस केर्न्स हा 1989 ते 2006 दरम्यान न्यूझीलंडसाठी 62 कसोटी आणि 215 एकदिवसीय सामने खेळला. केर्न्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8273 धावा केल्या आणि याशिवाय त्याच्या नावावर 420 विकेट्स देखील आहेत. केर्न्सने कसोटीत 5 आणि एकदिवसीय सामन्यात 4 शतके केली आहेत.