शरद पवारांचं नाव घ्यायची लायकी आहे का? मुश्रीफ सोमय्यांवर संतापले!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज कराड येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा एकदा भ्रष्ट्राचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. याप्रकरणी हसन मुश्रीफ यांनी संताप व्यक्त करत शरद पवार यांच नाव घेण्याची यांची लायकी आहे का?? असा संतप्त सवाल केलाय.

आमच्यावरआत्तापर्यंत एकही घोटाळ्याचा आरोप झालेला नाही. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे, ते होणार नाही. शरद पवारांचा काय संबंध आहे ह्यात? त्यांचं नाव का घेतायत? त्यांचं नाव घ्यायची लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचं नाव घेतायत हे. हे बोलण्यापासून त्यांना रोखण्यासाठी मी उच्च न्यायालयात जाणार आहे.

हे सर्व भाजपचे षडयंत्र असून चंद्रकांत पाटील हेच यामागील मास्टरमाइंड आहेत असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. , मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितलंय, आपल्याला आता शांत बसून चालणार नाही, आपल्या सगळ्यांवर हे आरोप करतील, आपल्याला त्यांचे घोटाळे काढावे लागतील, लोकशाही मार्गाने सगळं करावं लागेल असेही हसन मुश्रीफ म्हणाले.

You might also like