बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्हा रुग्णालयात (clash in beed civil hospital) एक धक्कादायक घटना घडली आहे. खरंतर घटना ही दुसरीकडे घडली आहे. पण त्याचे पडसाद थेट बीडच्या जिल्हा रुग्णालयात (clash in beed civil hospital) उमटले. जिल्हा रुग्णालयातील या राड्यामुळे जिल्हा रुग्णालयातील (clash in beed civil hospital) इतर रुग्ण भयभीत झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याने हा वाद मिटला.
काय घडले नेमके ?
बीडच्या गजानन नगर भागात राहणाऱ्या एका 22 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी पती, सासू आणि नंदेला जिल्हा रुग्णालयात मारहाण (clash in beed civil hospital) केली आहे. सीमा निलेश राठोड असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. बीड जिल्हा रुग्णालयात (clash in beed civil hospital) रात्री साडेनऊच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह आणण्यात आला. त्यावेळी महिलेच्या माहेरच्या मंडळींनी हॉस्पिटलमध्ये जोरदार राडा (clash in beed civil hospital) केला. तसेच त्यांनी सासू, पती आणि सासरच्या मंडळींना मारहाणसुद्धा केली.
बीड जिल्हा रुग्णालयात जोरदार राडा, आत्महत्या करणाऱ्या विवाहितेच्या पती आणि सासूला मारहाण pic.twitter.com/zSbMzcX9nm
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 17, 2022
जवळपास अर्धा तास हा धिंगाणा हॉस्पिटलमध्ये (clash in beed civil hospital) सुरू होता. त्यामुळे रुग्णालयातील बाकीच्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली मात्र पोलिसांना त्या ठिकाणी पोहोचायला अर्धा तास लागला. त्यानंतर सासू आणि इतर सासरच्या मंडळींना ताब्यात घेण्यात आलं. तर पती हॉस्पिटलमधून फरार झाला. सीमाने आत्महत्या केली नसून सासरच्या मंडळींनी छळ करून खून केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.जोपर्यंत पती आणि सासरच्या मंडळींना अटक होत नाही तोपर्यंत पोस्टमार्टम केले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा मृत महिलेच्या नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे काही काळ जिल्हा रुग्णालयात (clash in beed civil hospital) तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हे पण वाचा :
PNB ने ग्राहकांना दिला धक्का, आता पेट्रोल-डिझेलच्या डिजिटल पेमेंटवर मिळणार नाही कोणतीही सूट !!!
वसईतील बिअर बारमध्ये वेटर आणि ग्राहकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी
ENG vs NED : इंग्लंडने वनडे मध्ये 498 रन करत रचला वर्ल्ड रेकॉर्ड
सध्याच्या घसरणीच्या काळात 100 टक्क्यांहून जास्त रिटर्न देणाऱ्या ‘या’ शेअर्सवर एकदा नजर टाकाच !!!
अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांनी रेल्वेला आग लावली तसेच स्टेशनवरील स्टॉलही लुटला