कंपनी अधिकाऱ्याच्या पत्नीचे बॅंक खाते साफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – पैठण येथील औषधी कंपनीच्या उपमहाव्यवस्थापकाच्या पत्नीस ऑनलाइन भामट्याने एनी डेस्क ॲप डाऊनलोड करण्यास सांगून 1 लाख 11 रुपयांना फसवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

सातारा ठाण्यात जिडू छायादेवी जे.व्ही.एस शंकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 12 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी ऑनलाईन किराणा व मेडिसिन खरेदी करण्यासाठी त्यांनी मोबाईल मधून ॲमेझॉन संकेतस्थळ उघडून आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट कार्डची माहिती भरून पैसे अदा करण्याचा प्रयत्न केला. पैसे जात नसल्यामुळे फोन पे द्वारे पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला, तरी ही रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे गुगलच्या संकेतस्थळावरून फोन पे कस्टमर केअरचा नंबर शोधला. फोन केल्यानंतर संबंधितांने एनी डेक्स ॲप डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला. त्याने गुगल प्ले स्टोअर वर जाऊन ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. तसेच बँकेची सर्व कागदपत्रे फोटो काढून मोबाईल मध्ये ठेवण्यासही सांगितले.

छायादेवींनी बँकेची कागदपत्रे मोबाईल मध्ये फोटो काढून ठेवली. त्यानंतर काही वेळातच बँकेच्या खात्यातून दोन वेळा 50 हजार 5 रुपये वजा झाले. हा प्रकार शेजाऱ्यास सांगितल्यानंतर त्यांनी बँकेच्या कस्टमर केअर सोबत बोलून खाते गोठवले.