मुंबई प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची महाजनादेश यात्रा काढण्यात आली होती. त्या यात्रेला मधेच थांबवण्याची नामुष्की भाजपवर आली. कारण महाराष्ट्रातील पूर परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा महाजनादेश यात्रेला निघणार आहेत. या यात्रेची सुरुवात २१ ऑगस्ट रोजी नंदुरबार शहरातून होणार आहे. तर ३१ ऑगस्टला सोलापूरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या यात्रेचा शेवट होणार आहे.
महाजनादेश यात्रा दुसऱ्या टप्प्यात म्हणजे २१ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत १ हजार ८३९ किमीचा प्रवास करणार आहे. या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात १४ जिल्हे आणि ५५ मतदारसंघ असणार आहेत. त्याच प्रमाणे यात ३९ जाहीर सभा आणि ५० स्वागत सभांचे आयोजन कऱण्यात आले आहे.
या यात्रेत मुख्यमंत्री रथावरूनच स्वागत स्वीकारणार आहेत. त्याच प्रमाणे ३ हजारापेक्षा जास्त लोक एकत्रित आले तर त्यांना मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत. त्याच प्रमाणे या यात्रेचा तिसरा टप्पा गणेश उत्सवाच्या सांगते नंतर सुरु होणार आहे अशी माहिती महाजनादेश यात्रेचे मुख्य आयोजक भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.