मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाय घसरून पडलेल्या महिला पोलिसाला दिला मदतीचा हात

0
60
Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून विविध चांगल्या आणि मोठ्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. त्यांनी कामाला वेगाने सुरुवात केली आहे. ते गरजेच्या ठिकाणी अधिकाऱ्यांना धारेवरही धरत आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापक विभागाच्या अधिकाऱ्यांशीदेखील चर्चा करण्यापासून ते ठाण्यासाठी नवं धरण उभारण्याबाबतची घोषणा असेल, त्यांच्या कामांचा सपाटा सुरुच आहे.

यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील माणुसकीचं दर्शन घडवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. एक महिला पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना पाय घसरुन पडली. या महिलेला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वत: हात दिला. तिची विचारपूस केली आणि रुग्णालयात दाखल करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले.रुपाली साळुंखे या महिला पोलीस कर्मचारी पाय घसरून पडल्या. ही घटना मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येताच त्यांनी महिला पोलिसाला मदतीचा हात दिला. त्यांनी स्वत: महिला पोलिसाला पाणी दिलं. तसेच महिला पोलिसाला तातडीने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करुन योग्य उपचार द्यावेत, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा संवेदनशील स्वभाव याआधी विधानसभेच्या सभागृहातही बघायला मिळाला होता. सभागृहात भाषण करताना मुख्यमंत्री भावूक झालेले महाराष्ट्राने पाहिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली धडाकेबाज कामगिरी सुरु केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यातील महत्त्वाची घोषणा म्हणजे त्यांनी पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी टोलमाफ केलं आहे.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here