हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत जी -20 परिषद पार पडणार आहे. या परिषदेसाठी देशातील विविध राज्यातील मुख्यमंतरू उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत असल्याने त्यांच्याकडून राज्यपाल व कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली जाईल का? तसेच याबाबत निर्णय घेतला जाईल का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप नेत्याकडून केली जात असलेली वक्तव्ये यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी भाजप खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, खा. संजय राऊत यांच्यासह काही नेत्यांनी राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.
दिल्ली: भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मुलाकात की। pic.twitter.com/DVQClysCmS
— ANI_HindiNews (@AHindinews) December 5, 2022
राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत खा. उदयनराजेंनी राष्ट्रपतींकडे पत्र पाठवून मागणीही केली आहे. त्यानुसार गृहमंत्रालयाने राज्यपालांच्या विधानाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. याबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचे विधान केले. सीमावाद संदर्भात मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेतील, असे फडणवीसांनी म्हंटले आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले असल्याने ते याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार का? हे पहावे लागणार आहे.