हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत विधिमंडळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे माझ्यासारखे सर्वसामान्य शिवसैनिक विधानसभेपर्यंत पोहचू शकले. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद, धाडस बाळासाहेबांनी दिली. आज आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारच सरकार स्थापन केलं आहे. त्यांनी सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी विचाराची तडजोड कधी केली नाही,” असा टोला शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला.
मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांनीही महाराष्ट्रात अनेक बदल केले. ज्यांना काहीच पार्श्वभूमी नाही अशांना त्यांनी मोठं केलं. त्यामुळे एक शेतकऱ्यांच्या कुटूंबातील मुलगा आज मुख्यमंत्री झाला. त्याच्या विचारात जादू आहे. त्याच्यामुळे आम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळते. हि बाळासाहेबांची खरी शिकवण होती. पाकिस्तान बाळासाहेब ठाकरे नावाला खबरायचा. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही आज सरकार पुढे नेत आहोत.
बाळासाहेब बोलायचे एकदा शब्द दिला कि विसरायचे नाही. त्यांनी धाडस करण्याची शिकवण दिली. धाडस करायला देखील हिम्मत लागते. ताकद लागते. बाळासाहेबी आमचे कुटूंब होते. आज आनंद दिघे असते तर त्यांचा उर भरून आला असता. ठाण्याने पहिली सत्ता दिली शिवसेनेला, ठाणे व शिवसेनेचे वेगळेच नाते होते. ते जेव्हा दिघे साहेबानंतर ठाण्यात यायचे तेव्हा सांगायचे कि एकनाथ शिंदे आहे त्यामुळे मला आता ठाण्याची चिंता नाही.
विधानभवनात पार पडलेल्या बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहील नार्वेकर, विरोधीपक्षनेते अजित पवार, ठाकरे कुटुंबाकडून राज ठाकरे, स्मिता ठाकरे, अनुराधा जयदेव ठाकरे, निहार ठाकरे उपस्थित होते.