हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर राज्य सरकारने ठराव करावा, अशी मागणी विरोधी पक्षातील सदस्यांकडून केली जात होती. आज विधिमंडळाच्या अधिवेशनात सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना 20 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा केली.
आज अधिवेशनात सीमाप्रश्नी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठराव मांडल्यानंतर सीमेवरील नागरिकांचे आभार मानले. यावेळी शिंदे म्हणाले की, ज्यांनी सीमाप्रश्नी बलिदान दिले त्यांना हुतात्म म्हणून घोषित केले आहे. सध्या 13 लाभार्थी लाभ घेत आहेत. बेळगाव, कारवार, बिदर येथील मराठी लोकांना सर्व सोयी सुविधा मिळणार आहे. या नागरिकांना फक्त 15 वर्ष महाराष्ट्रात राहत असल्याचा दाखला द्यायचा आहे. तसेच शिक्षमासाठीही त्यांना सोयी-सुविधा देण्यात आलेल्या आहेत.
सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या नागरिकांना हुतात्म म्हणून घोषित करण्यात आले, त्यांच्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीला दरमहा 10 हजार रुपये निवृत्ती वेतन तसेच वार्षीक प्रवास भत्ता 500 रुपये आणि 5 हजार रुपये तत्कालीक होती ती आपण आता 20 हजार रुपये करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात दिली.