हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आला असून आता तरी मुंबईची लोकल सर्वांसाठी चालू होणार का असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. पण मुंबईतील लोकल तूर्तास सुरू होणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेत नाही आहोत. पहिल्या टप्प्यात लोकलचा निर्णय घेणं कठिण आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. त्यासाठी केंद्रानेही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल.
ते पुढे म्हणाले, सर्व ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांना कामाच्या वेळा विभागण्याची विनंती करतो आहे. वर्क फ्रॉम होमचे नियोजन करा, उद्योगांना शक्य आहे तिथे बायो बबल करणे व आरोग्याचे नियम पाळून सुरक्षितरित्या उत्पादन कसे करता येईल याचा विचार करावा, असं ते म्हणाले.