सॉफ्टवेअर कंपनीत केली तब्बल 70 लाखांची चोरी! 24 तासांच्या आत पोलिसांनी केले जेरबंद!
पुणे | पुण्यातील कल्याणीनगर येथील आयटी पार्क परिसरातून एका सॉफ्टवेअर कंपनीतील तब्बल 70 लाखांचे समान चोरीला गेले होते. यामध्ये नेटवर्क साहित्याचा समावेश होता. ही चोरी करणाऱ्या चोरट्याला येरवडा पोलिसांनी 24 तासांच्या आतमध्ये अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून 52 लाख 50 हजार किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणात चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. परिसरात चर्चा रंगली होती. यामुळे सर्वजण तणावाखाली होते. अश्यातच पोलिसांनी गणेश दोलारे नामक 31 वर्षीय तरुणाला अटक केली होती. गणेशला अटक केल्यानंतर त्याने चोरीची कल्पना पोलिसांना दिली. त्यानंतर मुंबई येथील कुलदीप चौहान यालाही अटक केली. कुलदीप याने चोरीचा माल विकत घेतला होता.
येरवडा पोलिस तपास करत असताना त्यांना गणेश डोलारे याच्यावर शंका आली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने कंपनीतील वायफाय ॲक्सेस पॉइंट चोरल्याची कबुली दिली. चोरलेले साहित्य त्याने मुंबईमधील कुलदीप चौहान याला विकल्याचेही सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कुलदीपला ताब्यात घेतले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.