हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कोरोनाचा नवा विषाणू ‘ओमिक्रॉन’ मुळे संपूर्ण जगाची चिंता वाढवली असून त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बैठक बोलावली आहे. दरम्यान या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांनी कोरोना संदर्भात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. संध्याकाळी ५.३० वाजता ही बैठक होणार आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनंतर राज्य सरकारने तातडीने काही नियमबदल करत निर्बंध लावले होते. हे निर्बंध या बैैठकीनंतर आणखी कडक होणाार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार नाही, मात्र केंद्रशी बोलून काही निर्बंध लावाले लागतील असं सूचक विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासनदेखील सतर्क झाले आहे. मुंबईत येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मागील पंधरा दिवसांच्या प्रवासाची आवश्यक माहिती संकलित करावी, असे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत