मी सीबीआय, ईडीशी लढतोय अन् तुम्ही माझ्याशी लढण्याची भाषा करता; उद्धव ठाकरेंची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सातत्याने स्वबळाचा नारा देण्यात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले असून त्यांनी याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचं समोर येत आहे. त्याचाच भाग म्हणून नाना पटोले याना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले होते.

मी ईडी आणि सीबीआयशी लढत आहे, आणि तुम्ही माझ्याशीच लढण्याच्या गोष्टी करता? हे कितपत योग्य आहे? अशाने सरकार कसे चालेल?’ अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत बोलावून स्पष्ट शब्दांत समज देण्यात आल्याचे वृत्त आहे.

नाना पटोलेंच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते नेते बाळासाहेब थोरात आणिअशोक चव्हाण यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी हा विषय पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यापुढे मांडला. तरीही पटोले यांनी स्वबळाचा नारा सुरू ठेवल्याने ठाकरे यांनी दिल्लीत थेट सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर वेगाने सूत्रे हलली तसेच पाटील यांनीदेखील आपण एकत्रित काम करू, योग्य ती समज देण्यात आली आहे, असा संदेश मुख्यमंत्री ठाकरे यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment