माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नकोय याच वाईट वाटत- उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. राज्यात लवकरच राजकीय भूकंपाची शक्यता असून याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला. माझ्याच लोकांनी माझ्यावर अविश्वास दाखवला याच वाईट वाटत अस उद्धव ठाकरेंनी म्हंटल.

उद्धव ठाकरे म्हणाले, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यावर विश्वास दाखवला. पण माझ्याच लोकांनी माझ्यावर अविश्वास दाखवला याचे वाईट वाटत. पण तरीही जर कोणाला वाटत असेल की मी मुख्यमंत्री पदाच्या लायक नाही तर त्यांनी समोर येऊन बोलावं आणि मला सांगावं.. मी लगेच राजीनामा द्यायला तयार आहे. येवडच नव्हे तर मी पक्षप्रमुख पदाचाही राजीनामा द्यायला तयार आहे.

जेव्हा महाविकास आघाडी सरकारची सत्ता स्थापन करायची होती तेव्हा शरद पवारांनी मला मुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा आग्रह केला म्हणून मला हे पद स्वीकारावे लागले असेही उद्धव ठाकरेंनी नमूद केले.

या लोकशाहीत ज्यांच्याकडे संख्या जास्त आहे, तो जिंकतो. मग तुम्ही ती कशी जमवता, हे महत्त्वाचं नसतं. मी ज्यांना माझे मानतो, त्यांच्यापैकी कितीजण तिकडे गेलेत? माझ्याविरुद्ध मतदान केल? हे महत्त्वाचं नाही. माझ्याविरोधात एकानंही मतदान केलं, तरी माझ्यासाठी ती लाजिरवाणी बाब आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

Leave a Comment