रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच; मुख्यमंत्र्यांचे मोदींना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रत्नागिरीतील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्यांमुळे रखडला आहे. मात्र हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच बारसू गाव परिसरात उभारण्याबाबत राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र सरकार रिफायनरी साठी सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नाणार रिफायनरीला स्थानिकांचा विरोध पाहता या रिफायनरीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातीलच बारसू सालेगाव आणि पश्चिम भागातील गावातील काही गावांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्याचा राज्य सरकारसाज विचार आहे. बारसू रिफायनरीसाठी जवळपास १४ हजार एकर जमीन आणि बंदरासाठी जवळपास २४१४ एक जागा देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प हा रत्नागिरीतच होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मीडिया रिपोर्ट्समधून हे सांगितलं जात आहे

नाणार इथला तेलशुद्धीकरण प्रकल्प शिवसेनेच्या विरोधामुळेच बारगळला होता. प्रकल्पाच्या विरोधातील स्थानिकांच्या आंदोलनाला साथ देत शिवसेनेनं नाणार प्रकल्प जाणार अशी भूमिका घेतली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी एका मराठी वृत्तपत्रानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारचं मनपरिवर्तन झाल्यानं या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाल्याचं वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून त्यांनीही नाणार रिफायनरी वर भाष्य करत म्हंटल की, नाणार प्रकल्प स्थलांतरित करायचा असेल, तर तो जिथे लोकांना विचारात घेऊन जिथे विरोध नसेल अशा ठिकाणी भूमिपुत्रांना न्याय कसा मिळेल, याचा विचार करून पुढची पावलं उचलली जातील, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

Leave a Comment