हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी प्रवर्गातील समाजाला त्यांच्या न्याय्य आणि हक्काचं जे आहे ते देऊ. त्यांच्या हक्काचं जे असेल त्यातील एक कणही कमी होऊ देणार नाही,” असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सरकारला इशारा दिला होता की ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू त्यालाच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण अजून तापण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाच्या विविध संघटना आणि नेत्यांसोबत सरकारची चर्चा सुरू आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर वकिलांशीही चर्चा सुरू आहे. यासोबतच ओबीसी समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्या समाजाच्या नेत्यांशीही सरकारची चर्चा सुरू आहे. पण विरोधकांनी राज्यातील सामाजित सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये. महाराष्ट्रातील एकजूट आणि त्याला तडा जाईल असं काही करू नये. ओबीसीला समाजाला कारण नसताना डिवचण्याचं काम करू नये. ज्यांच्या हक्काचं आहे त्यातलं काहीही सरकार कमी करणार नाही, असं सांगत, ओबीसी समाजाला न डिवचण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.
राज्यातील जनतेत सरकारबद्दल नाराजी नाहीए. पण विरोधकांना राज्यात अघोषित आणीबाणी वाटत असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आपल्या मागण्यासांठी आंदोलन ( farmers protest ) करत आहेत. या शेतकऱ्यांशी नीट बोलणं, त्यांच्या मागण्या जाणून घेणं हे तर सोडाच ऐन थंडीत त्यांच्या पाण्याचे फवारे मारले जात आहेत. हे सद्भावनेचं लक्षण नाहीए. आता त्याची व्याख्या त्यांना बदलायची असेल तर ते बदलू शकतात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला टीकेचं लक्ष्य केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’