मुंबई । विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण, कोरोना ते शेतकरी अशा अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करु शकतात. तत्पूर्वी काल झालेल्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत ‘आणीबाणी’चा मुद्दा चांगलाच गाजताना पाहायला मिळाला. दरम्यान, दिल्लीतील कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलकांवर मोदी सरकारकडून सतत आरोप केले जात आहे. केंद्रातील मंत्र्यानी या आंदोलनामागे चीन पाकिस्तानचा हात असल्याचे सांगण्याची मजल मारली यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( cm uddhav thackeray )यांनी आक्षेप घेत भाजपला धारेवर धरले.
शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान, चिनी की अतिरेकी आहेत हे भाजप नेत्यांनी ठरवावं. पण आपल्या देशातील अन्नदात्याला देशद्रोही किंवा अतिरेकी ठरवणं हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. कामगार, शेतकऱ्यांच्या न्याय हक्काबाबत कोणी बोललं तर ते देशद्रोही. विरोधात बोललं आणि तुरुंगात टाकणं ही आणीबाणी नाही का? पाकिस्तानमधून कांदा आणणारे तुम्हीच. आता पाकिस्तानमधून शेतकरी आणताहेत का? की आपल्या शेतकऱ्यांना पाकिस्तान ठरवतात. आपला शेतकरी न्यायासाठी लढला तर तो देशद्रोही. बाहेर कांदा आणि साखर आयात करून त्याच्यावर अन्याय का केला जातोय? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना सुनावलं. (Two-day winter session of the legislature begins today)
याशिवाय, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अघोषित आणीबाणीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. राज्यात एकप्रकारे अघोषित आणीबाणीची परिस्थिती आहे. राज्य सरकारविरोधात बोलणाऱ्याला तुरुंगात टाकले जात असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फडणवीसांच्या या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिलं. राज्यात अघोषित आणीबाणी असेल तर देशात काय घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारणं ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का? असा खोचक प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी विचारला.
आपल्या न्याय हक्कासाठी लढणं आणि कृषी कायद्या आडून आणि कामगार कायद्याआडून ही गळचेपी सुरू आहे. कामगार, शेतकऱ्यांसह इतरांच्या न्यायहक्कांबद्दल कुणी बोललं तर तो देशद्रोही? जर विरोधात बोललं आणि तुरुंगात टाकणं ही आणीबाणी असेल तर न्यायहक्कासाठी लढणाऱ्या देशद्रोही ठरवणं हे आणीबाणी पेक्षाही जास्त पातक आहे, असं उद्धव ठाकरे आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कृषी कायद्यांबद्दल इथं बोलण्यापेक्षा दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी कायदा किती त्यांच्या हिताचा ते जाऊन सांगावं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला. घरगुती कामगारांप्रमाणे केंद्र सरकार सरकारी संस्थांचा वापर करतंय. हे सर्व खेळ जनता पाहते आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’