हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याचा मुद्दा काढून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या भूमिकेला भाजप नेत्यांनीही पाठिंबा देत शिवसेनेची कोंडी केली. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्द्यांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बोट दाखवले आहे. केंद्राने जशी नोटाबंदी केली तशी भोंगाबंदीही देशभर करून टाका अस म्हणत उद्धव ठाकरेंनी भोंग्याचा चेंडू मोदींकडे टोलवला आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य करत भाजप आणि मनसेवर निशाणा साधला. केंद्राने देशात नोटबुक केली, जीएसटी कायदा लागू केला, लॉकडाऊन केलं त्याचप्रमाणे संपूर्ण देशात भोंगा बंदी करून टाका अस उद्धव ठाकरे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे, त्यामध्ये आपले केंद्र सरकार ही एक पार्टी होती, केंद्र सरकारने तो आदेश काढला पाहिजे. त्यामध्ये देखील तो जर का निकाल तुम्ही नीट वाचला, तर तो सर्वधर्मीयांना आणि सर्वांना तो लागू आहे. त्यामुळे नुसते एखादे भोंगे काढा असं नाही, मग आपल्याला सर्व धर्मीयांना ते पाळावं लागेल. अस मुख्यमंत्र्यांनी म्हंटल.
यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वर देखील निशाणा साधला. आता काही नवे खेळाडू आले आहेत. ते कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, कधी याचा खेळ तर असे खेळाडू असतात ना असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. कोरोनामुळे २ वर्षे नाटक, चित्रपट बंद होते. आता फुकटात करमणूक मिळत असेल, तर का नको? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.