उस्मानाबाद । भाजपसाठी 40 वर्षे योगदान दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून येत्या शुक्रवारी दुपारी 2 वाजता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची मोठी आणि अधिकृत घोषणा जयंत पाटील यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी खडसे यांनी भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून ते आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ‘ही खूप आनंदाची बातमी आहे. खडसेंचं महाविकास आघाडीच्या कुटुंबामध्ये स्वागत आहे’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
शुक्रवारी दुपारी २ वाजता एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र, खडसे यांच्या स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे या मात्र भाजपमध्येच राहणार असून हा खडसे यांच्या राजकीय खेळीचा भाग असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
खडसे शुक्रवारी २ वाजता बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. “गेले ३ दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले. (Eknath Khadse to enter NCP on Friday Jayant Patil announce)
एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात होणार नाही, उजेडात होईल, खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच फायदा होईल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. खडसेंनी भाजपचा त्याग केल्याने शुक्रवारी दुपारी २ वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यामुळे राष्ट्रवादीचं बळ वाढेल. एक अनेक वर्षांचा अनुभवी नेता अनेक प्रश्नांशी मुद्द्यांवर काम करुन, महाराष्ट्राची जाण असणार नेता राष्ट्रवादीत येत आहे. त्यांचं स्वागतं, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.
'एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश अंधारात नाहीतर, उजेडात होईल'- जयंत पाटील
वाचा सविस्तर -👉 https://t.co/7DQhzoFoHq
@EknathKhadseBJP @Jayant_R_Patil @MumbaiNCP @PawarSpeaks @BJP4Maharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 21, 2020
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, म्हणाले..
वाचा सविस्तर -👉 https://t.co/4ndFq9CZOh@CMOMaharashtra @EknathKhadseBJP @BJP4Maharashtra @NCPspeaks #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 21, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”