एकनाथ खडसेंनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

हिंगोली । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसे यांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. तत्पूर्वी बुधवारी एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांचे भाजपमधील कट्टर प्रतिस्पर्धी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. मला एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची अधिकृत माहिती नाही. अधिकृतरित्या राजीनामा दिल्याचे कळल्यावरच मी यावर बोलेन. आमचे अध्यक्ष हे आधीच खडसेंसोबत बोलत आहेत, तेच याबद्द्ल सांगू शकतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

खडसे शुक्रवारी २ वाजता बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. “गेले ३ दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले. (Eknath Khadse to enter NCP on Friday Jayant Patil announce)

एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात होणार नाही, उजेडात होईल, खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच फायदा होईल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. खडसेंनी भाजपचा त्याग केल्याने शुक्रवारी दुपारी २ वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यामुळे राष्ट्रवादीचं बळ वाढेल. एक अनेक वर्षांचा अनुभवी नेता अनेक प्रश्नांशी मुद्द्यांवर काम करुन, महाराष्ट्राची जाण असणार नेता राष्ट्रवादीत येत आहे. त्यांचं स्वागतं, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

 

You might also like