हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून आढावा घेणार आहेत. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र आजच्या या मिटिंग ला उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या ऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीसाठी उपस्थित राहतील.
देशभरात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. या बैठकीमध्ये पुन्हा निर्बंध कठोर करण्याबरोबरच देशभरामध्ये लॉकडाउन लावण्याच्या शक्यतेबद्दलही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री सहभागी होणार आहेत.
कधी आहे मोदींची बैठक-
पंतप्रधान मोदी आज दुपारी साडेचारच्या सुमारास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. १९ राज्यांमध्ये १० हजारहून अधिक ओमायक्रॉन करोना रुग्ण असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी बुधवारी दिली होती.